तेरी औकात क्या है??
काही महिन्यांपुर्वी माझ्या एका मित्राने मला त्याने भाड्याने घेतलेलं नवीन घर(फ्लॅट) बघायला बोलावलं होतं. मी एका शनिवारी दुपारच्यासुमारास त्याला भेटायला गेलो. त्याचं घर पुण्याच्या एका मध्यमवर्गीय(मिडील-क्लास्) वसाहतीत(सोसायटीत) होतं. वसाहत बर्यापैकी मोठी होती. तिथे एक माणूस वसाहतीच्या लाद्या(फर्श्या - टाईल्स्) साफ करत होता. बहुधा तो त्या वसाहतीचा सफाई कामगार असावा. मी त्याला माझ्या मित्राचा पत्ता विचारला. तो म्हाणाला "मला माहित नाही साहेब. मी इथे नवीन आहे". मग मी तिथे असलेले नाम-फलक(नेम प्लेटस्) वाचायला लागलो. मला जाणवल की त्या वसाहतीत एकाही घराचा मालक मराठी नाहीये, सर्व अमराठी! असो. मला मित्राचं घर सापडल. तो पहिल्याच मजल्यावर रहात होता. मी लगेच त्याच्या घराकडे निघालो. जवळ-जवळ दोन-एक तास मित्राच्या घरी गप्पा मारल्यानंतर मी माझ्या घरी परतायला निघालो. पायर्यांवरून खाली उतरत असतांना समोर फार छान दृश्य होतं; संद्याकाळच्या ऊनात काही मुलं वसाहतीच्या छोट्याश्या बागेत खेळत होती तर वयस्कर मंडळी इमारतीच्या उंबरठ्यावर बसून गप्पामारत होती. तो सफाई कामगार जो मला आधी भेटला होता, त्याचं अजून फर्शी पुसण्याच काम सुरु होत. मी पायर्यांवरुन उतरत असतांना, माझ्या बरोबर एक वयस्कर बाईसुद्धा तीच्या नातवाला घेऊन पायर्या उतरत होती. तीचा नातू बहुधा ५-६ वर्षाचा असावा. खाली उतरल्या-उतरल्या त्या मुलाने पळ काढला आणि शेजारी ठेवलेल्या फुलांच्या कुंड्यांमधली माती घेतली आणि तो जो सफाई कामगार फर्श्या साफ करत होता त्याच्या समोर साफ केलेल्या फर्श्यांवर टाकली! त्या बाईने आणि तेथे बसलेल्या सर्व लोकांनी ते बघितलं. पण आजूबाजूला बसलेली लोकं सोडा, त्या मुलाची आजी सुद्धा त्या मुलाला एक शब्द बोलली नाही! तर तो सफाई कामगार त्या मुलाला म्हणाला, "अरे, हे काय केलं? ही फर्शी साफ केली आहे". लगेच त्या मुलाची आजी जोरात खेकसून रागाने ओरडून म्हणाली, "तेरी औकात क्या है मेरे पोते को बोलने की???". मला धक्काच बसला! तिच्या नातवाला समजावण्याऐवजी, ही बाई त्या सफाई कामगारालाच विचारते की "तेरी औकात क्या है?"; आणि आजूबाजूला बसलेली लोकं सुद्धा असं वागत होती जणूकाही झालच नाही! मला रहावलं नाही म्हणून मी त्या बाईला म्हणालो, "दादीजी, वो इतने घंटोसे साफ-सफाई कर रहा है इसलीये वो बोला". लगेच आजूबाजूला बसलेली लोकं आणि त्या बाई माझ्याकडे डोळे मोठे करुन रागाने बघायला लागली, जणूकाही मी गुन्हाच केला! मी त्या सफाई कामगाराकढे बघितलं तर त्याने आपले डोळे नमावले, मान खाली घातली आणि परत फर्श्या साफ करायला घेतल्या. मी तेथून निघालो. घरी परत जात असतांना, जे काही घडलं त्याचा विचार करु लागलो आणि असं वाटलं की ते दिवस दुर नाही जेव्हा मराठी माणसाला महाराष्ट्रातचं विचारलं जाईल, "मराठी मानुस, तेरी औकात क्या है??"
आधीच उत्तरेकढील आणि दक्षिणेकढील बातमीपत्रांनी "आता मुंबईत फक्त २३% मराठी उरलेत!" असा गाजावाजा करायला सुर्वात केलीये. आपण नागपुर अगोदरच गमावलय. आणि आजकाल पुण्याकढे बघितल्यावर पुण्याची परिस्थिती काही वेगळी होईल असं वाटत नाही! आणि असचं चालत राहीलं तर महाराष्ट्रात मराठी माणसांची "औकात" विचारणार्यांची कमतर्ता भासणार नाही.
आपुली भाषा टिकली तर आपुली संस्कृती टिकेल. आपली संस्कृती टिकली तर आपलं अस्थित्व टिकेल! ह्या गोष्टीचा मराठी लोकांना विसर पडूनये हीच ईच्छा.
दुर्दैव महाराष्ट्राचे!
एका अमराठी व्यक्तिशी काही वर्षा पुर्वी मी बोलत होतो, आणि चर्चा काही कारणा मुळे मराठी लोकांच्या स्वभावावर वळली. आणि तो अमराठी माणूस काही वाक्य बोलूनगेला. तो म्हणाला “मराठी लोकं खेकड्यासार्खी आहेत. एका खेकड्याला टोपलीत टाका, खेकडा हुषार अस्तो, तो बरोबर टोपलीच्या बाहेर येतो. पण टोपलीत दोन जरी खेकडे टाकले तर त्यातला एकही खेकडा बाहेर येऊशकत नाही, कारण बाहेर येण्याच सोडून ते खेकडे एक दुसऱ्याला खाली खेचण्यात दंग होतात आणि एकहीजण बाहेर येऊशकत नाही. म्हणून खेकडे पकडणारे केव्हाही टोपलीत एकापेक्षा जास्त खेकडे ठेवतात.”
महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती अशीच आहे. दिल्लीच्या खेकडे पकडणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या टोपलीत नेहमीच एकापेक्षा जास्त खेकडे टाकलेत, मग तो खेकडेपकडणारा कमळ असो का पंजा असो. मराठी लोकांनाच वाडग घेऊन दिल्लीला भीक मागायची सवय लागलीये. जोपर्यंत महाराष्ट्राचा एखादा स्थानिक पक्ष बहुमताने सत्तेत येत नाही तोवर हे असच चालणार. मराठी लोकांनी तमिलनाडु, आन्धरा, युपी, केरळ, बंगाल, बिहार, पंजाब, दिल्ली, कश्मीर वगेरे राज्यांकडूकाही शिकाव. घरात कितीही वादविवाद असले तरी बाहेरच्या जगासमोर एकजूटता दाखवायला हवी. परप्रांतियांना माहीत आहे की एखाद्या मराठी माणसाची उंची कमी करायची असेल तर त्याच्या समोर दुसऱ्या मराठी माणसाला ऊभ करावं, म्हणजे दोघं मिळून एक दुसऱ्याची उंची कमी करतील आणि आपुली उंची मोठी होईल. हेच मराठी लोकांना कळत नाही.
लहानपणी शाळेत आम्हाला एकदा वर्गात गुरुजींनी एक गोष्ट सांगितली होती; दोन माकडं आणि एका कोल्ह्याची. बहुतेक सर्वांना ही गोष्ट माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. दोन माकडं झाडावर बसली होती. त्या दोघांना जमीनीवर एक मिठाईचा तुकडा दिसला. दोगही मिठाईचा तुकडा घेण्यासाठी धावली. दोघांनी एकाचवेळेस तो तुकडा उचलला आणि दोघही भांडायला लागली. पहिलं माकड म्हणालं, “ही मिठाई माझी आहे! मी अगोदर मिठाई उचलली.” दुसर माकड म्हणालं, “नाही, ही मिठाई माझी आहे! मी मिठाई पहिले उचलली.” आणि असं भांडत–भांडत दोघे ही परत झाडावर पोहोचली. झाडावर बसून भांडत असतांना तेव्हड्यात खालून एक कोल्हा जात होता. त्यांनी ह्या दोन माकडांना भांडतांना बघितलं आणि त्यांच्या हातातला तो मिठाईचा तुकडा बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने ह्या माकडांना वेड्यात काढून तो मिठाईचा तुकडा मिळवायच ठरवल. तो त्या माकडांकडे बघून म्हणाला, “अरे! अरे! अरे! कशाला भांडताय? शांत व्हा. काय झालं भांडायला?” त्यावर एक माकड म्हणालं, “ही मिठाई माझी आहे. मी पहिले मिठाई उचलली.” त्यावर दुसर माकड लगेचच म्हणालं, “नाही, नाही! मी अगोदर मिठाई उचलली. ही मिठाई माझी आहे!” त्यावर तो कोल्हा म्हणाला, “अरे, भांडु नका. मी करतो त्या मिठाईची समान वाटणी. द्या इकडे ती.” दोघ माकडांनी ती मिठाई त्या कोल्ह्याला दिली. कोल्हा चालू. त्याने मिठाईची समान वाटणी न करता, एक तुकडा लहान आणि दुसरा तुकडा मोठा केला. मग तो त्या माकडांकडे वळाला आणि लहान तुकडा पुढे करत तो पहिल्या माकडाला म्हणाला, “हे घे.” त्यावर माकड लगेच म्हणालं, “हा तुकडा लहान आहे. ही समान वाटणी नाही.” त्यावर कोल्हा म्हणाला, “ठीक आहे. समान वाटणी करतो.” आणि त्याने मोठ्या तुकड्याचा एक चावा घेतला आणि खाल्ला, आणि दुसऱ्या माकडाकडे वळून म्हणाला, “हे घे.” त्यावर दुसरं माकड रागाने म्हणालं, “मला ही वाटणी मान्य नाही. आता माझा तुकडा लहान झालाय!” त्यावर कोल्हा म्हणाला, “ठीक आहे. समान वाटणी करतो.” आणि त्याने मोठ्या तुकड्याचा एक चावा घेतला आणि खाल्ला, आणि पहिल्या माकडाकडे वळून म्हणाला, “हे घे.” त्यावर पहिलं माकड लगेच म्हणालं, “आता माझा तुकडा लहान झालाय. मला हे मान्य नाही.” त्यावर कोल्हा म्हणाला, “ठीक आहे.” आणि त्याने मोठ्या तुकड्याचा एक अजून चावा घेतला आणि खाल्ला. असं करत–करत कोल्याने सर्व मिठाई खाऊनटाकली आणि हसत–हसत निघून गेला, आणि माकडं भांडत राहिली!
महाराष्ट्रात आज बरीच माकडं आहेत आणि महाराष्ट्राबाहेर बरेच कोल्हे आहेत. दुर्दैव महाराष्ट्राचं!
पण ह्यावर उपाय आहे. जसे इतर राज्यात होते तसचं मराठी जनतेने स्थानिक राजनीतिक पक्षांना प्राधान्य द्यावे आणि बहुमताने निवडून आणावे, त्यामुळे इथल्या पक्षांना दिल्लीतल्या पक्षांसमोर लोटांगण घालावेलागणार नाही. महाराष्ट्रात स्थानिक पक्षांची कमतरता नाहीये(राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे, रीपई, शेतकरी संघटना इं). जर निवडून आलेल्या स्थानिक पक्षाने काम नाही केले तर पुढच्या वेळी दुसऱ्या स्थानिक पक्षाला निवडून आणा. पण राज्यात काम करणारा राजनीतिक पक्ष हा स्थानिकच असला पाहिजे. त्यामुळे "गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा" असे प्रकार होणार नाहीत. शेवटी घरातली भांडणं चव्हाट्यावर कशाला? त्यामुळे अखेरीस बाहेरच्यांनाच त्याचा लाभ होणार.